दुबई - आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने २०१९ या वर्षाचा, आपला कसोटी आणि एकदिवसीय संघ जाहीर केला आहे. भारतीय कर्णधार विराट कोहलीकडे आयसीसीने आपल्या एकदिवसीय आणि कसोटी संघाचे नेतृत्व दिले आहे. एकदिवसीय संघात भारतीय संघातील विराटसोबतच रोहित शर्मा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव यांना स्थान देण्यात आले आहे. तर कसोटी संघात मयांक अग्रवाल याचा सलामीवीर म्हणून समावेश करण्यात आला आहे.
आयसीसीने निवडलेल्या संघात ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंचे वर्चस्व आहे. कसोटी संघात ऑस्ट्रेलियाचे ५, न्यूझीलंडचे ३, भारताचे २ आणि इंग्लंडच्या एका खेळाडूचा समावेश आहे. दरम्यान या संघात दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडीज, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि झिम्बाब्वे या संघातील एकही खेळाडूचा समावेश नाही.
- असा आहे आयसीसीचा कसोटी संघ -
विराट कोहली (कर्णधार), मयांक अग्रवाल, टॉम लॅथम, मार्नस लाबुशेन, स्टिव्ह स्मिथ, बेन स्टोक्स, बीजे वॉटलींग, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, नील वॅगनर आणि नॅथन लियोन. - असा आहे आयसीसीचा एकदिवसीय संघ -
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, कॅरी होप, बाबर आझम, केन विल्यमसन, बेन स्ट्रोक्स, जोस बटलर (यष्टीरक्षक), मिचेल स्टार्क, ट्रेंट बोल्ट, मोहम्मद शमी आणि कुलदीप यादव.