लंडन- आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेमध्ये इंग्लंडने भारताचा विजयी रथ रोखला. या सामन्यात यजमान इंग्लंडने भारताचा ३१ धावांनी पराभव केला. सामन्यानंतर भारतीय कर्णधार विराट कोहलीने पराभवाचे खापर मैदानावर फोडले. कोहलीने मैदानाच्या सीमारेषा जवळ असल्याने आमचा पराभव झाल्याचे सांगितले. दरम्यान भारताच्या या पराभवानंतर भारतीय संघाला संघाच्या जर्सीवरुन मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले आहे.
ICC WC २०१९ : 'या' कारणाने झाला भारताचा पराभव; विराट कोहलीने दिली कबुली - इंग्लंड
आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेमध्ये इंग्लंडने भारताचा विजयी रथ रोखला. या सामन्यात यजमान इंग्लंडने भारताचा ३१ धावांनी पराभव केला. सामन्यानंतर भारतीय कर्णधार विराट कोहलीने पराभवाचे खापर मैदानावर फोडले. कोहलीने मैदानाच्या सीमारेषा जवळ असल्याने आमचा पराभव झाल्याचे सांगितले.
इंग्लडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. खेळपट्टी सपाट होती. त्यामुळे इंग्लंडच्या खेळाडूंनी याचा फायदा घेत ३३८ धावांचे लक्ष्य आमच्यासमोर ठेवले. मात्र, या लक्षाचा पाठलाग आम्हाला करता आला नसल्याची कबूली कर्णधार कोहली याने दिली.
या पराभवानंतर गुणतालिकेत मोठ्ठे फेरबदल झाले आहेत. इंग्लंडला स्पर्धेत आव्हान कायम राखण्यासाठी हा सामना जिंकणे गरजेचे होते. तेव्हा इंग्लंडने चांगली कामगिरी करत भारताला ३१ धावांनी धूळ चारली. या विजयासह इंग्लंडचा संघ स्पर्धेमध्ये टिकून आहे. दरम्यान, या सामन्यात भारताची जर्सी बदलण्यात आली होती. त्यामुळे भारताचा पराभव झाला असल्याची टीका सद्या सोशल मीडियावर केली जात आहे.