मेलबर्न - भारतीय संघाचा अनुभवी फिरकीपटू गोलंदाज रविचंद्रन अश्विन याला सामन्यात दबाव निर्माण करण्याची संधी दिली असल्याची कबुली ऑस्ट्रेलियाचा अनुभवी फलंदाज स्टिव्ह स्मिथने दिली. माझ्या कारकिर्दीमध्ये कोणत्याही फिरकीपटूला याआधी मी असा दबाव निर्माण करण्याची संधी दिली नव्हती, असे देखील स्मिथने सांगितले.
भारताविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेत स्मिथला आतापर्यंत उल्लेखनीय कामगिरी करता आलेली नाही. अशात भारतीय संघाने दुसरा कसोटी सामना ८ गडी राखून जिंकत मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. दुसरा सामना संपल्यानंतर स्मिथ म्हणाला की, मी अश्विनच्या गोलंदाजीचा सामना ज्या प्रकार करायला हवा होता, त्या पद्धतीने करू शकलो नाही. मला अश्विनवर दबाव निर्माण करायला हवे होते. पण झाले उलट अश्विनला मी दबाव निर्माण करण्याची संधी दिली. याआधी मी अशी संधी कोणत्याही गोलंदाजाला दिली नव्हती.
दुसरीकडे अश्विनने सांगितले की, स्मिथ विरोधात खास रणणिती आखत गोलंदाजी केली. ऑस्ट्रेलियामध्ये खेळताना जर तुम्ही स्मिथला बाद करू शकला नाही तर तुम्हाला अडचणीत वाढ होते. तो फलंदाजीमध्ये महत्वपूर्ण भूमिका निभावतो. स्मिथ मोठी खेळण्यासाठी उत्सुक आहे. पण ते यावर्षी होऊ शकले नाही.