मुंबई - प्रसिद्ध क्रीडा पत्रकार आणि समालोचक हर्षा भोगले यांनी आयपीएल २०२० चा सर्वोत्कृष्ट संघ निवडला आहे. त्यांनी आपल्या संघात विराट कोहली, रोहित शर्मासह अनेक दिग्गज खेळाडूंना घेतलेले नाही. दरम्यान, भोगले यांनी आपल्या संघातील खेळाडूंची निवड आयपीएल २०२० मधील कामगिरीवर केली आहे.
असा आहे हर्षा भोगले यांचा संघ -
हर्षा भोगले यांनी आपल्या संघात केएल राहुल आणि शिखर धवन यांना सलामीवीर म्हणून निवडले आहे. यानंतर त्यांनी सूर्यकुमार यादवला संघात ठेवले आहे. एबी डिव्हिलियर्स आणि केरॉन पोलार्ड यांच्यावर मधल्या फळीची जबाबदारी भोगले यांनी सोपवली आहे. यानंतर हार्दिक पांड्या आहे. जोफ्रा ऑर्चर, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांच्यावर वेगवान गोलंदाजीची धुरा आहे. तर युजवेंद्र चहल आणि राशिद खान या फिरकीपटूंना भोगले यांनी आपल्या संघात स्थान दिलं आहे.
भोगले यांनी आपल्या संघात मुंबई इंडियन्सचे चार खेळाडू घेतले आहेत. किंग्ज इलेव्हन पंजाब आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघातील प्रत्येकी दोन खेळाडूंना त्यांनी निवडलं आहे. महत्वाची बाब म्हणजे भोगले यांन पर्पल कॅप विजेता कागिसो रबाडा त्यांच्या संघात घेतलेले नाही.