महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

अवघ्या ७० धावांवर ऑलआऊट झाली टीम इंडिया, तरीही हरमनप्रीतने गाठले शतक.. - harmanpreet kaur 100 t20 match

हरमनप्रीतने भारतासाठी खेळताना टी-२० सामन्यांचे शतक गाठले आहे. टी-२० क्रिकेटमध्ये १०० आंतरराष्ट्रीय सामने खेळणारी हरमनप्रीत पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली आहे. हरमनप्रीतनंतर, न्यूझीलंडची सुजी बेट्स आणि ऑस्ट्रेलियाची एलिस पेरी यांनी १११ सामने खेळले आहेत. त्यानंतर, पाकिस्तानची बिस्माह माहरूफ आणि वेस्टइंडीजची स्टेफानी टेलरने १०० टी-२० सामने खेळले आहेत.

अवघ्या ७० धावांवर ऑलआऊट झाली टीम इंडिया, तरीही हरमनप्रीतने गाठले शतक..

By

Published : Oct 5, 2019, 11:10 AM IST

सूरत -लालाभाई काँट्रेक्टर स्टेडियममध्ये खेळल्या गेलेल्या महिलांच्या अंतिम टी-२० सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने भारताचा १०५ धावांनी पराभव केला. पाहुण्यांच्या १७६ धावांचा पाठलाग करताना टीम इंडिया अवघ्या ७० धावाच करू शकली असली तरी, भारताची धडाकेबाज फलंदाज हरमनप्रीत कौरने एक शतक गाठले आहे.

हेही वाचा -आफ्रिकेचा भारताला मोठा धक्का, अवघ्या ७० धावांवर आटोपली टीम इंडिया

हरमनप्रीतने भारतासाठी खेळताना टी-२० सामन्यांचे शतक गाठले आहे. टी-२० क्रिकेटमध्ये १०० आंतरराष्ट्रीय सामने खेळणारी हरमनप्रीत पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली आहे. हरमनप्रीतनंतर, न्यूझीलंडची सुजी बेट्स आणि ऑस्ट्रेलियाची एलिस पेरी यांनी १११ सामने खेळले आहेत. त्यानंतर, पाकिस्तानची बिस्माह माहरूफ आणि वेस्टइंडीजची स्टेफानी टेलरने १०० टी-२० सामने खेळले आहेत.

हरमनप्रीतनंतर भारतासाठी मिताली राजने सर्वाधिक सामने खेळले आहेत. तिच्या नावावर ८९ आंतरराष्ट्रीय सामने आहेत. मितालीनंतर वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीने ६८ सामने खेळले आहेत. आफ्रिकाविरुद्धच्या सहाव्या टी-२० सामन्यात पाहुण्यांच्या १७६ धावांचा पाठलाग करताना टीम इंडिया अवघ्या ७० धावाच करू शकली. भारताने ही मालिका ३-१ ने जिंकली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details