मुंबई- न्यूझीलंड आणि भारत यांच्यात झालेल्या दुसऱ्या टी-ट्वेन्टी सामन्यात भारताने न्यूझीलंडचा ७ गडी राखून दणदणीत विजय मिळवला. संघाच्या विजयात क्रुणाल पंड्याने महत्वाचे योगदान देताना न्यूझीलंडचे ३ गडी बाद केले. हार्दिकने भावाच्या या कामगिरीसाठी ट्वीटरवर त्याचे अभिनंदन केले आहे.
भावा तुझ्याबद्दल गर्व वाटत आहे - हार्दिक पंड्या - अभिनंदन
क्रुणालने सामन्याच्या मोक्याच्यावेळी गोलंदाजी करताना पहिल्याच षटकात न्यूझीलंडच्या कॉलिन मनरो आणि डॅरेल मिचेलला बाद केले. त्यानंतर, दुसऱ्या षटकात कर्णधार केन विलियमनसनला बाद करत न्यूझीलंडला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखले.
क्रुणालने सामन्याच्या मोक्याच्यावेळी गोलंदाजी करताना पहिल्याच षटकात न्यूझीलंडच्या कॉलिन मनरो आणि डॅरेल मिचेलला बाद केले. त्यानंतर, दुसऱ्या षटकात कर्णधार केन विलियमनसनला बाद करत न्यूझीलंडला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखले. त्याच्या या कामगिरीमुळे पहिल्या सामन्यात २१९ धावा करणार न्यूझीलंड संघाला केवळ १५८ धावाच करता आल्या. क्रुणालच्या या कामगिरीसाठी त्याला सामनावीराच्या पुरस्काराने गौरवण्यात आले. यानंतर अनेक दिग्गज खेळाडूंनी क्रुणालच्या गोलंदाजीचे कौतूक केले. मोठ्या भावाचे कौतुक करताना भावा तुझ्याबद्दल गर्व वाटत आहे, अशी ट्वीटरवर पोस्ट केली आहे.
दुसऱ्या सामन्यातील विजयामुळे भारताने मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. रविवारी हॅमिल्टन येथे मालिकेतील तिसरा सामना होणार आहे. हा सामना जिंकल्यास भारताला पाकिस्तानच्या सलग ११ मालिका विजयाच्या विक्रमाशी बरोबरी करण्याची संधी असणार आहे.