मुंबई- भारतीय क्रिकेटर हरभजन सिंग याने सोशल मीडियावर एक पोस्टर शेअर केले आहे. यात पोस्टरमध्ये दाक्षिणात्य सुपरस्टार अर्जुन याच्यासोबत स्वत: हरभजनही दिसत आहे. हरभजन लवकरच चित्रपट सृष्टीत पदार्पण करत आहे. त्याच्या पहिल्या डेब्यू चित्रपटाचे हे पोस्टर आहे.
हरभजनच्या पहिल्या चित्रपटाचे नाव 'फ्रेंडशिप' आहे. याचे दिग्दर्शन जॉन पॉल राज आणि शाम सुर्या यांनी केले आहे. फिरकीपटू भज्जी या चित्रपटातून नविन इनिंगला सुरूवात करत आहे. भज्जीच्या अभिनयाने सजलेला हा चित्रपट यावर्षी ऑगस्ट महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
भज्जीने हा पोस्टर शेअर करताना, त्याला फ्रेंडशिप मुव्ही, असे कॅप्शन दिले आहे. यासोबत त्याने एक व्हीडिओ कॅमेरावाला आणि दुसरा चश्मा घातलेला स्माईली इमोजीही जोडला आहे.