महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Apr 5, 2020, 8:55 PM IST

ETV Bharat / sports

हरभजन आणि तिची पत्नी गीता यांनी केले ५ हजार कुटुंबियांना अन्नदान

हरभजनने ट्विटमधून सांगितले की, 'सध्याच्या घडीला काही कुटुंबियाला अन्नधान्याचा प्रश्न भेडसावत आहे. या गरजू लोकांना मदत करण्यासाठी मी आणि पत्नी गीता यांनी पुढाकार घेतला आहे. आज जालंधर येथील पाच हजार लोकांना अन्नधान्य पुरवले आहे. यापुढेही असे काम करण्याची ताकद मला मिळो, हीच प्रार्थना.'

Harbhajan Singh and wife Geeta to feed 5000 families in Jalandhar
हरभजन आणि तिची पत्नी गीता यांनी केले ५ हजार कुटुंबियांना अन्नदान

मुंबई- सध्याच्या घडीला संपूर्ण देश २१ दिवसांसाठी लॉकडाऊन करण्यात आला आहे. या परिस्थितीमध्ये आर्थिक दुर्बल घटकांची चिंता वाढली आहे. कारण त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांच्या मदतीसाठी भारतीय संघाचा फिरकीपटू हरभजन सिंग सरसावला आहे. हरभजनने ५ हजार कुटुंबियांना अन्न-धान्य पुरवले. याची माहिती त्याने त्यांच्या ट्विटवरुन दिली.

हरभजनने ट्विटमधून सांगितले की, 'सध्याच्या घडीला काही कुटुंबियाला अन्नधान्याचा प्रश्न भेडसावत आहे. या गरजू लोकांना मदत करण्यासाठी मी आणि पत्नी गीता यांनी पुढाकार घेतला आहे. आज जालंधर येथील पाच हजार लोकांना अन्नधान्य पुरवले आहे. यापुढेही असे काम करण्याची ताकद मला मिळो, हीच प्रार्थना.'

दरम्यान, काही तासांपूर्वीच युवराज सिंहने पंतप्रधान सहायता निधीला ५० लाख रुपये दान केले आहेत. याशिवाय गौतम गंभीर, सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, अजिंक्य रहाणे, बजरंग पुनिया, पी. व्ही. सिंधू, मेरी कोम, मिताली राज, रोहित शर्मा, विराट कोहली, पूनम यादव, दीप्ती शर्मा, केदार जाधव आदींनी दान दिले आहे.

हेही वाचा -“वर्ल्डकप फायनलमध्ये मी धोनीला वर फलंदाजी करण्यास सांगितले होते”

हेही वाचा -Covid-१९ : युवराजने मोठी रक्कम दान देत ट्रोलर्सची केली बोलती बंद

ABOUT THE AUTHOR

...view details