कोलकाता - मुंबई आणि कोलकाता यांच्यात रविवारी झालेल्या सामन्यात आंद्रे रसेलने ४० चेंडूत ८० धावांची वादळी खेळी केली. त्याच्या या शानदार कामगिरीच्या जोरावर करो या मरोच्या सामन्यात कोलकात्याने विजय मिळवत प्ले ऑफमध्ये जाण्याच्या आशा जीवंत ठेवल्या आहेत. विजयानंतर संपूर्ण संघ मॅचचा हिरो आंद्रे रसेलच्या वाढदिवसाच्या पार्टीत दंग झाले.
रसेलच्या बर्थडे पार्टीत केकेआर दंग - Happy Birthday Andre Russell: Celebration After Kolkata Knight Riders Beat Mumbai Indian
मुंबई इंडियन्सविरुद्धच्या विजयानंतर जगातील सर्वच क्रिकेट समीक्षक रसेलची कामगिरी पाहून थक्क झालेत.
आंद्रे रसेलचा जन्म २९ एप्रिल १९८८ साली झाला आहे. तो आता ३१ वर्षाचा झाला आहे. त्याने रविवारच्या सामन्यात फलंदाजी आणि गोलंदाजीत दमदार कामगिरी केली. त्याने गोलंदाजीत २ गडी बाद केले तर फलंदाजीत ८० धावांचे योगदान देत संघाच्या विजयात महत्वाचा वाटा उचलला. त्यानंतर संघाने त्याच्या बर्थडे पार्टीत खूपच जल्लोष केला. रसेलच्या बर्थडे निमित्त केक कापण्यात आला. यावेळी संघातील खेळाडूंनी रसेलचे तोंड केकने भरवून टाकले. यावेळी संघाचा मालक किंग खान हाही उपस्थित होता.
मुंबई इंडियन्सविरुद्धच्या विजयानंतर जगातील सर्वच क्रिकेट समीक्षक रसेलची कामगिरी पाहून थक्क झालेत. त्याच्या या कामगिरीनंतर दिनेश कार्तिक प्रतिक्रिया देताना रसेल हा शानदार खेळाडू आहे. संघाच्या विजयात त्याने जबरदस्त योगदान दिले. या खेळीत अनुभव आणि परिपक्वता दिसून आली. दुसरीकडे रसेलने देखील हा विजय खास असल्याचे सांगितले.
TAGGED:
आंद्रे रसेल