महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

विराट कोहली झाला 'या' कंपनीचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर - virat kohli latest news

सध्याच्या जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटूंमध्ये विराट कोहलीचे नाव घेतले जाते. विराट आता एज्युकेशन टेक्नॉलॉजी कंपनी ग्रेट लर्निंगचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर झाला आहे.

Great learning appointed virat kohli as brand ambassador
विराट कोहली झाला 'या' कंपनीचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर

By

Published : Sep 14, 2020, 6:46 PM IST

नवी दिल्ली -भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली एज्युकेशन टेक्नॉलॉजी कंपनी ग्रेट लर्निंगचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर झाला आहे. ग्रेट लर्निंगने सोमवारी ही घोषणा केली. भारतीय कर्णधार आता ग्रेट लर्निंग ब्रँडचा चेहरा होईल, असे कंपनीने म्हटले आहे.

या नेमणुकीनंतर कोहली म्हणाला, "ग्रेट लर्निंग व्यावसायिक शिक्षण क्षेत्रात आघाडीची कंपनी आहे. या कंपनीने उच्च गुणवत्तेचे शिक्षण आणि करिअरमध्ये बदल घडवून आणण्यासाठी प्रतिष्ठा निर्माण केली आहे. मीसुद्धा सर्वोत्तम गोष्टींसाठी सर्वकाही करतो. मी ग्रेट लर्निंगशी जोडलो गेल्याने आनंदी आहे. "

ग्रेट लर्निंगचे मुख्य कार्यकारी अधिकारी मोहन लखमाराजू म्हणाले, "कोहली हा आमचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर होण्याची स्पष्ट निवड आहे, कारण तो उत्कृष्ट कार्यक्षमता आणि सतत शिकण्याचे प्रतीक आहे. कोहलीबरोबरच्या भागीदारीबद्दल आम्ही उत्सुक आहोत."

सध्याच्या जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटूंमध्ये विराट कोहलीचे नाव घेतले जाते. विराट कोहली सध्या आयपीएलच्या तयारीमध्ये व्यस्त असून तो या स्पर्धेत रॉयल चॅलेंजर बंगळुरू संघाचे नेतृत्व करणार आहे. यंदाची आयपीएल स्पर्धा १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत यूएईत खेळवण्यात येणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details