नवी दिल्ली - जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे गुरुवारी सुरक्षादलावर भ्याड हल्ला झाला. या घटनेचा सर्वस्तरातून निषेध होत आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने पाकिस्तानला ट्विट करुन खुले आव्हान दिले आहे. गौतम गंभीर म्हणाला, की पाकिस्तान बरोबर आता टेबलवर नाही तर युद्धाच्या मैदानात बोलणे झाले पाहिजे.
जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात झालेल्या अतिरेकी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) च्या ४४ जवानांना वीरमरण आले होते. तर कित्येकजण जखमी झाले आहेत. या हल्ल्यानंतर देशभरात सर्वत्र संतापाची लाट पसरली आहे.