नवी दिल्ली -माजी भारतीय सलामीवीर गौतम गंभीरने सचिन तेंडुलकरला सर्वोत्तम एकदिवसीय फलंदाज म्हणून संबोधले आहे. गंभीरने सचिनची कारकीर्द पाहता त्याला विराटपेक्षा वरचढ ठरवले आहे. भारताकडून विक्रमी 463 एकदिवसीय सामने खेळणार्या सचिनच्या नावावर 18 हजारांहून अधिक धावा आहेत. त्यात सचिनने 49 शतके केली आहेत. तर, कोहलीने 248 एकदिवसीय सामन्यात 12 हजार धावा केल्या असून 43 शतके ठोकली आहेत.
एका कार्यक्रमात गंभीरला विराट आणि सचिन यापैकी कोणाची निवड करशील असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा गंभीर म्हणाला, "सचिन तेंडुलकर ही माझ्यासाठी पहिली निवड असेल. हे खूप कठीण आहे. विराट कोहलीने उत्तम खेळ दाखवला आहे. पण आता क्रिकेटचे नियमही बदलले आहेत, त्यामुळे फलंदाजांना मदत झाली आहे."