महाराष्ट्र

maharashtra

हाच पाकिस्तानचा खरा चेहरा!

By

Published : Dec 27, 2019, 11:06 PM IST

पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने हिंदू क्रिकेटपटूसोबत पाकचे खेळाडू भेदभाव करत होते, असा गौप्यस्फोट केला. त्याच्या या वक्तव्याचा आधार घेत भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने पाकिस्तानवर टीका केली आहे.

गौतम गंभीर
गौतम गंभीर

नवी दिल्ली -पाकिस्तानचा माजी खेळाडू दानिश कनेरिया प्रकरणाने क्रिकेट जगतात खळबळ उडाली आहे. दानिश कनेरियाला हिंदू असल्याने संघात त्रास दिला जात होता असा गौप्यस्फोट रावळपिंडी एक्स्प्रेस शोएब अख्तरने होता. त्याच्या या वक्तव्याचा आधार घेत भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने पाकिस्तानवर टीका केली आहे.


प्रत्येक क्रिकेट संघात प्रतिभावंत खेळाडूंना संधी देतात, त्यांची जात किंवा धर्म पाहिला जात नाही. मात्र, पाकिस्तानकडून ही अपेक्षा ठेवणेच चुकीचे आहे. पाकिस्तामधील हिंदूंना त्रास देणे हा त्यांचा खरा चेहरा आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान स्वत: खेळाडू होते. तरीही त्यांच्या देशात अशा प्रकारच्या घटना घडने हे नक्कीच निंदनीय आहे. इम्रान खान भारतावर सारखी टीका करत असतात. मात्र, भारतासारख्या देशात मुस्लीम जनता अल्पसंख्याक असतानाही मोहम्मद अझरुद्दीन दीर्घकाळ भारतीय संघाचा कर्णधार होता, असे गौतम गंभीरने म्हटले आहे.

हेही वाचा - निवृत्तीच्या वाटेवरील फिलँडरपुढे इंग्लंड नतमस्तक!

पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने हिंदू क्रिकेटपटूसोबत पाकचे खेळाडू भेदभाव करत होते, असा गौप्यस्फोट केला. त्याने 'गेम ऑन है' या 'टीव्ही' शोमध्ये ही गोष्ट सांगितली. यावेळी पाकिस्तानचा माजी कर्णधार रशिद लतिफ आणि माजी फलंदाज आसिम कमाल हेही उपस्थित होते. शोएबच्या या वक्तव्याला दानिश कनेरियाने समर्थन दिले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details