मुंबई - भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वात खेळणाऱ्या, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाची कामगिरी आयपीएलच्या तेराव्या हंगामात फारशी चांगली झाली नाही. त्यांना प्ले ऑफ फेरीतून गाशा गुंडळावा लागला. यामुळे विराटच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत. यावर आता भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने विराटचा नवा पर्यायही समोर ठेवला आहे. त्याने रोहित शर्माकडे भारतीय टी-२० संघाचे कर्णधारपद द्यावे, असे म्हटले आहे.
काय म्हणाला गंभीर...
जर रोहित शर्मा भारताचा कर्णधार झाला नाही, तर ते रोहितचे नाही, तर भारतीय क्रिकेट संघाचे नुकसान असेल. एक कर्णधार त्याच्या संघाइतकाच चांगला असावा लागतो. याच्याशी मी पूर्णपणे सहमत आहे. परंतु कोण चांगला कर्णधार आणि कोण चांगला नाही, याबद्दल न्यायनिवाडा करण्यासाठी कोणते मापदंड आहेत? पॅरामीटर्स आणि बेंचमार्क समान असले पाहिजेत. रोहितच्या नेतृत्वात त्याच्या संघाने पाच आयपीएल विजेतेपदं पटकावली आहेत, असे गंभीरने सांगितले.
तर ते संघाचे नुकसान...