नवी दिल्ली -पाकिस्तानी क्रिकेटपटूंसाठी इंग्लंड हे चांगले घर असेल, असे वेस्ट इंडिजचे माजी वेगवान गोलंदाज मायकेल होल्डिंग यांनी म्हटले आहे. पाकिस्तानचा संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. मात्र, 29 सदस्यांपैकी 10 खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे. अनुभवी अष्टपैलू क्रिकेटपटू मोहम्मद हाफिज देखील कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले, परंतु नंतर त्याने आपली चाचणी निगेटिव्ह असल्याचा दावा केला.
होल्डिंग त्याच्या यू ट्यूब चॅनेलवर प्रसारित होणार्या कार्यक्रमात म्हणाले, "सध्या पाकिस्तानमध्ये जे काही घडत आहे त्यापेक्षा इंग्लंड बरेच सुरक्षित आहे असे दिसते. इंग्लंडमधील त्याचे निर्बंध चार जुलैपासून कमी होणार आहेत. पाकिस्तानमध्ये आणखी वाईट परिस्थिती आहे. एकदा इंग्लंडला पोहोचल्यानंतर ते जैव सुरक्षित क्षेत्रात असतील. एकदा ते इंग्लंडला पोचले की त्यांना दोन आठवड्यांसाठी क्वारंटाईन असतील.''