महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

..त्या दौऱ्यात  पाक क्रिकेट संघ व्यवस्थापनाने माझ्यावर बलात्काराचा आरोप करून संघाबाहेर ठेवले - अख्तर

शोएब म्हणाला, ''2005 साली ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात मला संघाबाहेर काढण्यात आले. मी अनफिट असल्याचे कारण देण्यात आले मात्र तसे नव्हते. पाकिस्तान क्रिकेट संघव्यवस्थापन आणि तत्कालिन कर्णधाराने माझ्यावर बलात्काराचा आरोप लावून मला संघाबाहेर केले होते. आजपर्यंत त्याने हा आरोप मागे घेतला नाही. पाक संघातील खेळाडूच्या एका चुकीमुळे हा खोटा आरोप माझ्यावर लावण्यात आला. मी ही घटना कधीच कोणत्या मीडियामध्ये प्रसिद्ध केली नाही, पण आज मी आज उघडकीस आणतोय.''

former pak bowler shoaib akhtar revealed  2005 rape allegation incident
पाक क्रिकेट संघव्यवस्थापनाने माझ्यावर बलात्काराचा आरोप ठेवला - अख्तर

By

Published : Jun 8, 2020, 8:35 PM IST

कराची - पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर आपल्या सडेतोड वक्तव्यामुळे चर्चेत असतो. नुकत्याच एका अ‌ॅपवर केलेल्या संभाषणात शोएबने पाकिस्तानच्या 2005 सालच्या संघाबद्दल गौप्यस्फोट केला आहे.

शोएब म्हणाला, ''2005 साली ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात मला संघाबाहेर काढण्यात आले. मी अनफिट असल्याचे कारण देण्यात आले मात्र तसे नव्हते. पाकिस्तान क्रिकेट संघव्यवस्थापन आणि तत्कालीन कर्णधाराने माझ्यावर बलात्काराचा आरोप लावून मला संघाबाहेर केले होते. आजपर्यंत त्याने हा आरोप मागे घेतला नाही. पाक संघातील खेळाडूच्या एका चुकीमुळे हा खोटा आरोप माझ्यावर लावण्यात आला. मी ही घटना कधीच कोणत्या मीडियामध्ये प्रसिद्ध केली नाही, पण आज मी हे उघडकीस आणतोय.''

तो पुढे म्हणाला, ''पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि संघातील खेळाडू अनेकदा माझ्या मीडियातील प्रसिद्धीमुळे मला त्रास देण्याचा प्रयत्न करायचे. पण मला मिळालेली प्रसिद्धी आणि यश हे माझ्या मेहनतीचे फळ आहे. मला त्रास देणारे ते खेळाडू आज नामशेष झाले आहेत. तर मला आजही संपूर्ण क्रिकेटविश्वात ओळखले जाते. तसेच भारतातही मला कधी द्वेषाला सामोरे जावे लागले नाही. भारतात मला नेहमी प्रेम मिळाले आहे.''

या संवादामध्ये शोएबने विराट आणि बाबर यांच्यातील तुलना चुकीचे असल्याचेही सांगितले. शोएबच्या मते विराटला कसोटी, एकदिवसीय सामने मोठ्या प्रमाणात खेळण्याची संधी मिळते. पण पाकिस्तानात आता क्रिकेटची परिस्थिती बेताची आहे. खेळाडूंना म्हणावी तशी संधी उपलब्ध होत नाही. आणि पाकिस्तान क्रिकेटच्या तिजोरीत खडखडाट असल्याने खेळाडूंना आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याची जास्त संधी मिळत नाही. त्यामुळे विराट आणि बाबर यांच्यातील तुलना चुकीची आहे. दोन्ही खेळाडू आपआपल्या जागेवर उत्तम कामगिरी करत असून आपआपल्या देशाचे नाव उंचावत आहे.

शोएबने भारतीय कर्णधारांविषयी बोलताना सांगितले, की जर आज महेंद्रसिंह धोनीने संघाला नाव मिळवून दिले, तर सौरव गांगुलीने भारताच्या संघाचा पाया रचला होता. सौरवने भारतीय संघासाठी त्यावेळी योग्य निर्णय घेतले. आधी पाकिस्तान संघ भारताला सहज हरवून जायचा. पण सौरवने तयार केलेल्या भारतीय संघाने पाकिस्तानला अनेकवेळा पराभूत करुन स्वत:ला सिद्ध केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details