नवी दिल्ली - ख्रिस गेल म्हटल्यावर आपल्यासमोर झटपट क्रिकेटमधील 'गगनचुंबी' षटकारांची आठवण येते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकारांच्या बाबतीत गेल पहिल्या स्थानावर आहे. पण, भविष्यात ख्रिस गेलला एक ज्युनियर 'गेल' आव्हान देऊ शकतो. भारताचा माजी फलंदाज आणि समालोचक आकाश चोप्राने एका लहान मुलाच्या फलंदाजीचा व्हिडिओ शेअर केला आहे. हा लहान मुलगा गेलप्रमाणेच चेंडूवर प्रहार करत आहे.
VIDEO : ज्युनियर 'गेल'च्या फलंदाजीवर भाळला आकाश चोप्रा - लिटल ख्रिस गेल
आपल्या इन्स्टाग्रामवर आकाशने हा व्हिडिओ शेअर केला आहे. गेलप्रमाणेच हा मुलगा डावखुरा आहे. अडीज-तीन वर्षे वय असलेला हा ज्युनियर गेल प्रत्येक चेंडुला लांब मारत असून आकाश चोप्राही या मुलावर भाळला आहे.
गेलप्रमाणेच हा मुलगा डावखुरा आहे. अडीज-तीन वर्षे वय असलेला हा ज्युनियर गेल प्रत्येक चेंडुला लांब मारत असून आकाश चोप्राही या मुलावर भाळला आहे. आपल्या इन्स्टाग्रामवर आकाशने हा व्हिडिओ शेअर केला आहे. या मुलाची गुणवत्ता दाखवणाऱ्या या व्हिडिओमध्ये आकाशनेही समालोचनाची झलक दिली असून "प्रेक्षकांमध्ये हेल्मेट वाटून टाका", असे आकाशने व्हिडिओमध्ये म्हटले आहे.
युनिव्हर्स बॉस या टोपणनावाने ओळखला जाणारा वेस्ट इंडिजचा दिग्गज फलंदाज ख्रिस गेल सध्या आयपीएलमध्ये व्यस्त आहे. गेल किंग्ज इलेव्हन पंजाबचा सलामीवीर फलंदाज असून पंजाब दिल्ली कॅपिटल्सविरूद्धच्या आपल्या आयपीएल अभियानाला प्रारंभ करणार आहे.