महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Sep 12, 2019, 10:00 PM IST

Updated : Sep 12, 2019, 10:19 PM IST

ETV Bharat / sports

फिरोज शाह कोटला आता अरुण जेटली स्टेडीयम या नावाने, कोहलीचाही सन्मान

भारताचे सर्वात जुने स्टेडीयम म्हणून ओळखले जाणारे फिरोज शाह कोटला स्टेडीयमचे नाव आता माजी मंत्री अरुण जेटली यांच्या नावाने ओळखले जाणार आहे.

अरुण जेटली स्टेडीयम

नवी दिल्ली - भारताचे सर्वात जुने स्टेडीयम म्हणून ओळखले जाणारे फिरोज शाह कोटला स्टेडीयमचे नाव आता माजी मंत्री अरुण जेटली यांच्या नावाने ओळखले जाणार आहे. दिल्ली क्रिकेट संघाचे (डीडीसीए) अध्यक्ष रजत शर्मा यांनी जवाहरलाल नेहरू स्टेडीयम येथे आयोजित कार्यक्रमात सांगितले. तसेच जेटली स्टेडीयमच्या एका पॅवेलीयनला भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीचे नाव देण्यात आले आहे. प्रशिक्षक रवी शास्त्री यांनाही यावेळी सन्मानित करण्यात आले.

हेही वाचा - कधी वाटलं नव्हतं की एवढा मोठा सन्मान मिळेल - विराट कोहली

डीडीसीएने आयोजित केलेल्या या समारंभात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, क्रीडामंत्री किरण रिजीजू, रेल्वेमंत्री पीयूष गोयल, राजवर्धन राठोड तसेच बीसीसीआयचे मान्यवर यावेळी उपस्थित होते. दक्षिण आफ्रिकेविरूद्ध टी-२० सामन्यासाठी निवडला गेलेला भारताचा संघही या कार्यक्रमात उपस्थित होता. तसेच भारताचे कर्णधार कपील देव, अजय जडेजा, अतुल वासन हेही यावेळी हजर होते. अरुण जेटली यांचे कुटुंबसुद्धा कार्यक्रमाला उपस्थित होते.

हेही वाचा - 'स्टायलिस्ट' विराट कोहली नाबाद '११'..लिहली भावनिक पोस्ट

दरम्यान, २७ ऑगस्ट रोजीच डीडीसीएने फिरोज शाह कोटला स्टेडीयमला माजी मंत्री अरुण जेटली यांचे नाव दिले असल्याची घोषणा केली होती. अरुण जेटली हे डीडीसीएचे याआगोदर अध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. २४ ऑगस्ट रोजी एम्स रुग्णालयात मृत्यू झाला होता. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांचे नाव स्टेडीयमला दिले आहे.

हेही वाचा - किंग कोहलीने मैदानाच्या बाहेर केला मोठा विक्रम, सचिनला टाकले मागे

कार्यक्रमात कर्णधार विराट कोहलीने जेटली यांची एक आठवण सांगितली तसेच त्यांचा ऋणी असल्याचेही तो म्हणाला. ज्यावेळी माझे वडील आम्हा कुटुंबीयांना सोडून गेले त्यावेळी जेटलीजी आमच्या घरी आले होते. त्यांनी आम्हा सगळ्यांना धीर देण्याचं काम केलं. ते एक नेताच नव्हते तर चांगले व प्रेमळ माणूस होते.

Last Updated : Sep 12, 2019, 10:19 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details