नवी दिल्ली -मुंबईकर आणि भारताच्या क्रिकेटचे भविष्य म्हणून नावारुपास आलेला फंलदाज पृथ्वी शॉला उत्तेजक द्रव्य सेवन केल्याप्रकरणी बीसीसीआयने ८ महिन्यांसाठी निलंबित केले. या निलंबनाची बातमी ऐकून सर्व क्रिकेटविश्वाला धक्का बसला आहे. शॉचे हे निलंबन १५ नोव्हेंबर २०१९ मध्ये संपुष्टात येणार आहे. या डोपिंग प्रकरणी नेटकऱ्यांनी पृथ्वीला धारेवर धरले आहे.
'भाई, ये तो शुरू होते ही खत्म हो गया', नेटकऱ्यांचा पृथ्वीवर हल्लाबोल
या निंलबनावर शॉने माफी मागितली आहे.
या प्रकरणावर चाहत्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. पृथ्वी शॉची सय्यद मुश्ताक अली चषक स्पर्धेदरम्यान लघवीचा नमुना घेण्यात आला होता. त्यानंतर २२ फेब्रुवारी २०१९ ला त्याची चाचणी घेण्यात आली. या चाचणीत पृथ्वीच्या शरीरात टर्ब्युटलाइन असल्याचे दिसून आले. टर्ब्युटलाइनचा समावेश वाडाने प्रतिबंधित द्रव्यांमध्ये केला असून यामुळे बीसीसीआयने पृथ्वी शॉवर निलंबनाची कारवाई केली.
या निंलबनावर शॉने माफी मागितली आहे. 'सय्यद मुश्ताक स्पर्धेदरम्यान मला सर्दी आणि खोकल्याचा त्रास होत होता. तेव्हा मी औषध घेतले. त्या औषधामध्ये बंदी घालण्यात आलेले द्रव्य असल्याचे आढळून आले. मी अप्रत्यक्षपणे बीसीसीआयच्या नियमाने उल्लंघन केले आहे. मला माझी चूक मान्य असून मला यातून धडा मिळाला', असल्याचे पृथ्वी म्हणाला.