जोहान्सबर्ग -दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी फलंदाज फाफ डु प्लेसिसने आयपीएल संघ चेन्नई सुपर किंग्जमधील (सीएसके) वातावरणावर भाष्य केले आहे. सीएसकेमध्ये वातावरण फार शांत असते, असे डु प्लेसिस म्हणाला.
डु प्लेसिसने झिम्बाब्वेचा माजी वेगवान गोलंदाज पॉमी मांग्वाशी इन्स्टाग्रामवर बोलताना सांगितले, "संघातला कोणीतरी खेळाडू आपल्याला सामना जिंकून देईल, असा आत्मविश्वास चेन्नईच्या ड्रेसिंग रूममध्ये आढळतो. आणि एखादा खेळाडू असे करतोच. सर्व खेळाडूंवर दबाव असतो. वारंवार कृतीतून आत्मविश्वास वाढतो. "