पोर्ट एलिझाबेथ - श्रीलंकेविरुद्ध यजमान दक्षिण आफ्रिकेला कसोटी मालिकेत २-० अशा मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले आहे. सामन्यानंतर प्रतिक्रिया देताना डु प्लेसिस म्हणाला, घरच्या मैदानावर श्रीलंकेविरुद्ध २-० अशा फरकाने झालेला पराभव आमच्या आत्मविश्वासाला पडलेला मोठा तडा आहे.
श्रीलंकेविरुद्धचा पराभवाने आमच्या आत्मविश्वाला मोठा तडा - फाफ डु प्लेसिस - पोर्ट एलिझाबेथ
डु प्लेसिस म्हणाला, घरच्या मैदानावर श्रीलंकेविरुद्ध २-० अशा फरकाने झालेला पराभव आमच्या आत्मविश्वासाला पडलेला मोठा तडा आहे.
डु प्लेसिस म्हणाला, या कसोटी मालिकेपूर्वी आम्ही घरच्या मैदानावर चांगले क्रिकेट खेळलो. परंतु, शेवटच्या २ कसोटी सामन्यात आम्ही नेहमीप्रमाणेच तयारी केली होती. पराभवाचे कारण म्हणजे, बहुतेक खेळाडू खूप दिवसांपासून सलग क्रिकेट खेळत आहेत. परंतु, हे कारण आम्ही देवू शकत नाही. माझ्या आणि संघाच्या दृष्टीने आमच्यासाठी हा कसोटीतील अत्यंत निराशाजनक पराभव आहे.
घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेला प्रथमच आशियाई देशांकडून कसोटी मालिकेत पराभवाला सामोरे जावे लागले आहे. भारत आणि पाकिस्तानसारख्या बलाढ्य आशियाई देशांनादेखील अशी कामगिरी करता आली नव्हती. इतर संघात आतापर्यंत फक्त इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांनीच आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकली होती.