नवी दिल्ली -भारतीय क्रिकेट संघाचे माजी क्रिकेटपटू मनोज प्रभाकर आणि त्यांची पत्नी फरहीन एका प्रकरणावरून अडचणीत सापडले आहेत. मनोज यांची पूर्व पत्नी संध्या प्रभाकर यांनी संपत्तीच्या विवादावरून मनोज प्रभाकर आणि फरहीन यांच्यावर मालवीय नगर पोलीस ठाण्यात एफआयर दाखल केली.
माजी क्रिकेटपटू मनोज प्रभाकर आणि त्यांची पत्नी फरहीन हेही वाचा -सुपर गुरू! राहुल द्रविड एक नाही तर तब्बल १६ देशांचा प्रशिक्षक
राजकारणातील काही व्यक्तींची मदत घेऊन दक्षिण दिल्लीतील फ्लॅट विकण्यात आला असल्याचा आरोप संध्या प्रभाकर यांनी केला आहे. या घटनेवरून जेव्हा मनोज आणि फरहीन यांच्याशी संपर्क साधण्यात आला तेव्हा त्यांनी संध्या यांना धमकावले असल्याचे या एफआयरमध्ये म्हटले गेले आहे. हा फ्लॅट परत करण्यासाठी फरहिनने त्यांच्याकडे १.५० कोटींची मागणी केल्याचा आरोपही संध्या यांनी केला आहे.
संध्या ही माजी क्रिकेटपटूची पहिली पत्नी आहे. संध्याने प्रभाकर आणि त्यांची आत्ताची पत्नी फरहिन आणि काही जणांवर त्याच्या मालमत्तेचा ताबा घेण्यासंदर्भात भारतीय दंड संहितेच्या ४२०/४६८/४७१/१२०-बी-३४ अन्वये आरोप केले आहेत. फरहीन यांची या मालमत्तेववर नजर असल्याचे संध्या यांनी म्हटले आहे.
फरहिन सुरूवातीला तमिळ आणि कन्नड चित्रपटांत काम केले असून त्यानंतर त्या मुंबईत शिफ्ट झाल्या. काही हिंदी चित्रपटात काम केल्यानंतर त्यांनी बॉलिवूडला रामराम ठोकला आणि क्रिकेटपटू मनोज प्रभाकर यांच्याशी लग्न केले.
संध्याने तिच्या एफआयआरमध्ये म्हटले आहे की, सर्वप्रिया विहार येथील ७/१८ इमारतीत दुसरा मजला फ्लॅट तिचा दुसरा पती दिगंत लक्ष्मीचंद पंडित यांनी विकत घेतला होता. १९९५ मध्ये खरेदी केलेल्या या फ्लॅटची सर्व कागदपत्रे लक्ष्मीचंद पंडित यांच्या नावावर आहेत. संध्या २००६ पर्यंत या फ्लॅटमध्ये राहिली. त्यानंतर संध्या यांच्या भावाच्या मित्राने हा फ्लॅट भाड्याने घेतला होता. यंदाच्या जुलै महिन्यात मनोज प्रभाकर यांनी गुंड पाठवून हा फ्लॅट ताब्यात घेतला. विशेष म्हणजे मनोज प्रभाकर आणि त्यांची पत्नी फरहीन याच इमारतीच्या पहिल्या मजल्यावर राहत आहेत.