नवी दिल्ली - क्रिकेटची 'क्रेझ' आता युरोप खंडातही पाहायला मिळत असून युरोपीय क्रिकेट लीग टी-10 च्या नावाने तिथे स्पर्धा रंगल्या आहेत. या लीगमध्ये 10-10 षटकांचे सामने होत आहेत. रोमांचक होत असलेल्या या स्पर्धेत नवनवीन रेकार्ड पाहायला मिळत आहेत. स्पर्धेच्या एका सामन्यात एका खेळाडूने 28 चेंडूत शतक ठोकत खळबळ उडवून दिली आहे. अहमद नबी असे त्या खेळाडूचे नाव असून त्याने ही झंझावती खेळी केली आहे.
ECL -T10 : धमाकेदार विश्वविक्रम.! या खेळाडूने 28 चेंडूतच ठोकले 'शतक'
युरोपीय क्रिकेट लीग 2019 च्या सातव्या सामन्यात ड्रॅक्स क्रिकेट क्लबचा सलामीवीर अहमद नबीने क्लज क्रिकेट संघाविरुध्द खेळताना 28 चेंडूत खणखणीत शतक ठोकले. त्याने ही खेळी 5 चौकार आणि 14 गंगनचुंबी षटकार ठोकत साकारली. नबीने सामन्यात दोन वेळा लगोपाठ 4-4 षटकार खेचले. 30 चेंडूत 105 धावा करुन नबी बाद झाला.

अहमद नबीने केलेल्या धमाकेदार खेळीने ड्रॅक्स क्रिकेट क्बबने 10 षटकात 6 गडी बाद 164 धावा केल्या. याला प्रत्युत्तर देताना विरोधी संघ क्लज क्रिकेट क्लबला 10 षटकात 5 गडी बाद 69 धावा करता आल्या. ड्रॅक्स क्रिकेट क्लबने हा सामना 95 धावांनी जिंकला.