महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

Happy Birthday Shikhar : 'गब्बर'वर क्रिकेटविश्वातून शुभेच्छांचा वर्षाव...! - शिखर धवनचा वाढदिवस

मस्तीखोर अशी ओळख असलेल्या धवनला टीम इंडियातील त्याच्या सहकाऱ्यांनी दिलेल्या शुभेच्छाही भन्नाट आहेत.

Etv Bharat special : twitter erupts wish shikhar dhawan happy birthday
Happy Birthday Shikhar : 'गब्बर'वर क्रिकेटविश्वातून शुभेच्छांचा वर्षाव...!

By

Published : Dec 5, 2019, 4:00 PM IST

नवी दिल्ली - टीम इंडियाचा 'गब्बर' खेळाडू शिखर धवनने कसोटी क्रिकेटमध्ये दणकेबाज एन्ट्री केली होती. त्याने पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलिया विरुध्द खेळताना १७४ चेंडूत १८७ धावांची खेळी केली होती. अशा या खेळाडूचा आज जन्मदिवस. शिखर धवनच्या वाढदिवसानिमित्त त्याच्यावर क्रिकेटविश्वातून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.

मस्तीखोर अशी ओळख असलेल्या धवनला टीम इंडियातील त्याच्या सहकाऱ्यांनी दिलेल्या शुभेच्छाही भन्नाट आहेत.

धवनने २०१० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने आतापर्यंत ३४ कसोटी, १३३ एकदिवसीय आणि ५८ टी-२० सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने अनुक्रमे २३१५, ५५१८ आणि १५०४ धावा केल्या आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details