महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

बंदीच्या शिक्षेनंतर स्टिव स्मिथची 'दणकेबाज' इंन्ट्री, ठोकले दोन्ही डावात शतक

अॅशेस मालिकेतील पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात स्मिथने १६ चौकार आणि २ षटकाराच्या मदतीने १४४ धावांची दणकेबाज खेळी केली होती. त्यानंतर दुसऱ्या डावातही स्मिथने शतक ठोकले आहे. दरम्यान, अॅशेस मालिकेत दोन्ही डावात शतक ठोकणारा स्मिथ आठवा फलंदाज ठरला आहे.

बंदीच्या शिक्षेनंतर स्टिव स्मिथची 'दणकेबाज' इंन्ट्री, ठोकले दोन्ही डावात शतक

By

Published : Aug 4, 2019, 7:32 PM IST

लंडन - चेंडू छेडछाड प्रकरणात १६ महिन्याची बंदीची शिक्षा भोगल्यानंतर पुन्हा मैदानात उतरलेला ऑस्ट्रेलियन फलंदाज स्टिव स्मिथ खोऱ्याने धावा जमवताना दिसत आहे. बंदीनंतर पहिल्याच कसोटी सामन्यात खेळताना त्याने दोन्ही डावात शतक ठोकण्याचा पराक्रम केला आहे. अॅशेस मालिकेतील पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात स्मिथने १६ चौकार आणि २ षटकाराच्या मदतीने १४४ धावांची दणकेबाज खेळी केली होती. त्यानंतर दुसऱ्या डावातही स्मिथने शतक ठोकले आहे. दरम्यान, अॅशेस मालिकेत दोन्ही डावात शतक ठोकणारा स्मिथ आठवा फलंदाज ठरला आहे.

अॅशेस मालिकेत एका कसोटी सामन्यात दोन्ही डावांमध्ये शतक ठोकण्याचा कारनामा १९०९ मध्ये ऑस्ट्रेलियन क्रिकेटर वारेन बार्डसेले यांनी केला होता.

दोन्ही डावांमध्ये शतक ठोकण्याच्या पराक्रम करणारे खेळाडू -

  • वारेन बार्डसेले ( १९०९)
  • हबर्ट स्टलिफ ( १९२५)
  • व्हॅली हॅमंड (१९२९)
  • डेनिस कॉम्पटन (१९४७)
  • आर्थर मॉरिस (१९४७)
  • स्टीव वॉ (१९९७)
  • मॅथ्यू हेडन (२००२)
  • स्टिव स्मिथ (२०१९)

ABOUT THE AUTHOR

...view details