मुंबई - इंग्लंडचा स्टार ऑलराउंडर मोइन अलीने क्रिकेटमधील स्लेजिंग थांबविण्यासाठी स्टंम्प माईकचा आवाज वाढविण्याची मागणी केली आहे. विंडीजचा वेगवान गोलंदाज शॅनन गेब्रियल यांने समलैगिंकतेसंबंधी टिप्पणी केल्यानंतर अलीने त्याचे मत व्यक्त केले.
स्लेजिंग थांबविण्यासाठी स्टंम्प माईकचा आवाज वाढवा - sledging
इंग्लंडचा कर्णधार जो रुटला समलैंगिकतेसंबंधी टिप्पणी केल्यानंतर आयसीसीने कडक पाऊल उचलत त्याच्यावर ४ एकदिवसीय सामन्यांची बंदी घातली. या कारवाईनंतर गॅब्रियलने जो रुटची माफीदेखील मागितली आहे.
इंग्लंडचा कर्णधार जो रुटला समलैंगिकतेसंबंधी टिप्पणी केल्यानंतर आयसीसीने कडक पाऊल उचलत त्याच्यावर ४ एकदिवसीय सामन्यांची बंदी घातली. या कारवाईनंतर गॅब्रियलने जो रुटची माफीदेखील मागितली आहे.
याबाबत बोलताना अली म्हणाला की, स्टंम्पचा आवाज वाढविल्याने मैदानावरील काही रंजक घटना समोर येतात. भारत आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यात आपण पाहिले आहे. क्रिकेटमध्ये स्लेजिंग झाली पाहिजे पण ती वैयक्तिक नको. कोणत्याही प्रकारची अभद्र भाषा वापरता कामा नये. मैदानावर जागरुक राहून बोलले पाहिजे, असे अली म्हणाला.