लंडन -कसोटीतील महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या अॅशेसच्या पहिल्या सामन्यात विश्वविजेत्या इंग्लंडला पराभव पत्करावा लागला. ऑस्ट्रेलियाने त्यांचा २५१ धावांनी पराभव केला. दुसऱ्या कसोटीपूर्वी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन दुखापतीमुळे संघाबाहेर पडला. आता अजून एका खेळाडूला संघाबाहेर ठेवण्यात आले आहे.
इंग्लंडच्या संघात बदल, आणखी एक खेळाडू अॅशेसच्या दुसऱ्या सामन्यातून बाहेर - जेम्स अँडरसन
फिरकीपटू मोईन अलीला अॅशेसच्या दुसऱ्या सामन्यातून संघाबाहेर ठेवण्यात आले आहे.
फिरकीपटू मोईन अलीला अॅशेसच्या दुसऱ्या सामन्यातून संघाबाहेर ठेवण्यात आले आहे. त्याच्या जागी डावखुरा फिरकीपटू जॅक लीचला संघात प्रवेश मिळाला आहे. लीचने आतापर्यंत पाच कसोटी सामने खेळले आहेत. यंदाच्या विश्वकरंडक स्पर्धेत नावाजलेल्या जोफ्रा आर्चरलाही संघात प्रवेश मिळाला आहे.
कसोटीतील इंग्लंडचा सर्वात यशस्वी गोलंदाज म्हणून ओळख असलेला जेम्स अँडरसन दुखापतीमुळे अॅशेसच्या दुसऱ्या कसोटीला मुकणार आहे. अँडरसनला पोटरीची दुखापत झाली आहे. त्यामुळे १४ ऑगस्टला होणाऱ्या लॉर्ड्स कसोटीपूर्वीच तो संघाबाहेर पडला आहे. या दुखापतीबाबच इंग्लंड क्रिकेटने माहिती दिली होती. पहिल्य़ा कसोटीत दुखापतीमुळे तो मैदानाबाहेर गेला होता.