हैदराबाद -इंग्लंडच्या एकदिवसीय संघाचा कर्णधार इयान मॉर्गनने आयर्लंडविरुद्धच्या तिसर्या एकदिवसीय सामन्यात इतिहास रचला. या सामन्यात मॉर्गनने १०६ धावांची शानदार खेळी केली. त्याच्या खेळीत १५ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता. या खेळीमुळे तो आता कर्णधार म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज ठरला आहे.
यापूर्वी हा विक्रम भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या नावावर होता. कर्णधार म्हणून धोनीने एकूण २११ आंतरराष्ट्रीय षटकार लगावले आहेत. मात्र, मॉर्गनने आता धोनीला मागे टाकले आहे. मॉर्गनकडे आता कर्णधार म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २१२ षटकार आहेत. त्याने आपल्या १६३व्या सामन्यात ही कामगिरी केली.