लंडन -बर्मिंगहॅम येथे रंगलेल्या अॅशेसच्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला दमदार प्रत्युत्तर दिले आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी १० धावावंरुन पुढे खेळताना चार गड्यांच्या मोबदल्यात २६७ धावा उभारल्या आहेत. इंग्लंडचा सलामीवीर फलंदाज रोरी बर्न्सने अॅशेसच्या पदार्पणात आणि वैयक्तिक पहिले शतक पूर्ण केले.
अॅशेस मालिका : शतकवीर बर्न्समुळे इंग्लंडचे ऑस्ट्रेलियाला दमदार प्रत्युत्तर - अॅशेस
बर्न्सने १६ चौकारांसह १२५ धावांची नाबाद खेळी केली.
बर्न्सने १६ चौकारांसह १२५ धावांची नाबाद खेळी केली. शुक्रवारी झालेल्या खेळानंतर इंग्लंडला २२ धावांवर जेसन रॉयच्या रुपात त्यांना पहिला धक्का बसला. पॅटिन्सनने त्याला बाद केले. त्यानंतर कर्णधार जो रुट आणि रोरी बर्न्सने शतकी भागीदारी रचली. रुटने ५७ धावा केल्यानंतर फलंदाजीला आलेल्या जॉय डेन्ली १८ धावांवर माघारी परतला. बटलरलासुद्धा स्वस्तात बाद झाला. त्यानंतर आलेला अष्टपैलू बेन स्टोक्सने नाबाद ३८ धावा केल्या आहेत.
त्याआधी ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव २८४ धावांवर आटोपला होता. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, कांगारूंचा डाव गडगडला. सलामीवीर डेव्हिड वार्नर आणि कॅमरुन बेनक्रॉफ्ट एकेरी धावसंख्येवरच तंबूत परतले. त्यानंतर स्टीव्ह स्मिथने पीटर सिडलला सोबत घेत संघाची पडझड थांबवण्याचा प्रयत्न केला. या सामन्यात स्मिथने चोविसावे कसोटी शतक झळकावले.