लॉर्ड्स -यंदाचा विश्वकरंडक जिंकलेल्या इंग्लंडचे पाय जमिनीवर आले आहेत. लॉर्ड्सवर सुरु असलेल्या कसोटी सामन्यात आयर्लंडने इंग्लंडचा ८५ धावांत खुर्दा उडवला आहे.
विश्वविजेत्या इंग्लंडची दांडी गुल; आयर्लंडने ८५ धावांत उडवला खुर्दा! - tjmurtagh
या सामन्यात आयर्लंडच्या टीम मुर्ताघने इंग्लंडचा अर्धा संघ गारद केला.
नाणेफेक जिंकून इंग्लंडला प्रथम फलंदाजी करणे खूप महागात पडले. सलामीवीर जेसन रॉय झटपट माघारी परतला. त्यानंतर आयर्लंडच्या गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्यामुळे इंग्लंडच्या फलंदाजांचा निभाव लागला नाही. कर्णधार जो रुटसह जॉनी बेअरस्टो, मोईन अली यांनीही धावफलक वाढवण्यामध्ये निराशा केली.
या सामन्यात आयर्लंडच्या टीम मुर्ताघने इंग्लंडचा अर्धा संघ गारद केला. त्याने रोरी बर्न्स, जेसन रॉय, जॉनी बेअरस्टो, मोईन अली, ख्रिस वोक्स या फलंदाजांना माघारी धाडले. टीमने ९ षटके टाकत अवघ्या १३ धावा दिल्या. तर इतर गोलंदाजांमध्ये आयर्लंडकडून मार्क आदीरने ३ तर बॉय रॅनकिनने २ बळी घेतले.