महाराष्ट्र

maharashtra

षटकांची गती संथ राखल्याने इंग्लंडच्या खेडाळूंना आकारण्यात आला दंड

By

Published : Mar 19, 2021, 7:53 PM IST

चौथ्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात इंग्लंडने षटकांची योग्य गती राखली नाही, त्यामुळे त्यांना सामन्याच्या २० टक्के दंड ठोठावण्यात आला आहे.

England cricket team fined
England cricket team fined

अहमदाबाद - षटकांची गती संथ राखल्याबद्दल इंग्लंडच्या खेळाडूंना दंड आकारण्यात आला आहे. काल येथे झालेल्या चौथ्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात इंग्लंडने षटकांची योग्य गती राखली नाही, त्यामुळे त्यांना सामन्याच्या २० टक्के दंड ठोठावण्यात आला आहे.

हेही वाचा -टी-२०त रोहित ९ हजारी मनसबदार; 'या' खेळाडूंनी केला कारनामा

२० टक्के दंड

इयॉन मॉर्गनचा संघ निर्धारित वेळेत एक षटक कमी टाकत असल्याचे आयसीसीच्या एलाइट पॅनलचे रेफरी जवागल श्रीनाथ यांच्या लक्षात आले. आयसीसीच्या आचारसंहिता अनुच्छेद २.२२नुसार षटकांची गती संथ राखणाऱ्या संघास दंडाची तरतूद आहे. त्यानुसार त्यांना सामन्याच्या २० टक्के दंड भरावा लागणार आहे.

वेगळी सुनावणी नाही

मॉर्गनने प्रस्तावित दंड स्वीकारला आहे, त्यामुळे यासंबंधी वेगळी सुनावणी होणार नाही. मैदानावरील पंच के. एन. अनंतपद्मनाभन, नितीन मेनन आणि तिसरे पंच (थर्ड अंपायर) वीरेंदर शर्मा यांनी संथ षटकांसंबंधी मॅच रेफरींकडे तक्रार केली होती.

हेही वाचा -विश्वकरंडक स्पर्धेचे पात्रता सामने स्थगित, कोरोनामुळे आयसीसीने घेतला निर्णय

शनिवारी शेवटचा सामना

टीम इंडियाने गुरुवारी रात्री झालेल्या सामन्यात आठ धावांनी विजय मिळवून पाच सामन्यांची मालिका २-२ अशी बरोबरीत आणली. शनिवारी याच मैदानावर मालिकेतील शेवटचा सामना रंगणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details