महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

बीसीसीआयच्या निवडणुका २३ ऑक्टोबरला रंगणार - election of bcci date

या निवडणूका आधी २२ ऑक्टोबरला होणार होत्या. मात्र, महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने आपल्या तारखेमध्ये एका दिवसाचा बदल केला आहे. बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीचे अध्यक्ष विनोद राय यांनी या बदललेल्या निवडणूकीच्या तारखेविषयी माहिती दिली.

बीसीसीआयच्या निवडणूका २३ ऑक्टोबरला रंगणार

By

Published : Sep 25, 2019, 8:44 AM IST

मुंबई -महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये विधानसभांचे बिगुल वाजले असताना भारतीय क्रिकेट नियामक मंडळानेही (बीसीसीआय) आपल्या निवडणूका जाहीर केल्या आहेत. बीसीसीआयच्या सार्वत्रिक निवडणूका २३ ऑक्टोबरला पार पडणार आहेत.

हेही वाचा -१५ वर्षाच्या शफालीने केला टी-२० क्रिकेटमध्ये मोठा विक्रम

या निवडणूका आधी २२ ऑक्टोबरला होणार होत्या. मात्र, महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने आपल्या तारखेमध्ये एका दिवसाचा बदल केला आहे. बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीचे अध्यक्ष विनोद राय यांनी या बदललेल्या निवडणूकीच्या तारखेविषयी माहिती दिली.

विनोद राय आणि डायना एडल्जी

विधानसभेमुळे सदस्यांना कोणताही त्रास होऊ नये या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला आहे. समितीच्या सदस्या डायना एडल्जी यांनी विलंबाला विरोध दर्शवला होता. मात्र, 'विधानसभा निवडणुकीमुळे एक दिवसाने क्रिकेट निवडणूक पुढे ढकलली हे समजू शकते,' असे एडल्जी यांनी सांगितले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details