अबुधाबी- आयपीएलच्या तेराव्या हंगामात आज डबल हेडरमधील पहिला सामना गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेल्या दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स असा होणार आहे. दिल्लीला आपले अव्वल स्थान कायम राखायचे असेल तर, त्यांना आजच्या सामन्यात विजय मिळवावा लागणार आहे. तर दुसरीकडे कोलकातासाठी हा सामना प्ले ऑफच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे.
दिल्लीकडून शिखर धवन शानदार फॉर्मात आहे. त्याने मागील दोन सामन्यांत सलग दोन शतके झळकावली आहेत. युवा पृथ्वी शॉला सलामीला चांगली खेळी करावी लागेल. शॉला गेल्या चारपैकी दोन डावांमध्ये खाते उघडता आले नाही. कर्णधार श्रेयस अय्यर स्नायूची दुखापत उद्भवण्यापूर्वी जशी फलंदाजी करीत होता, तशी फलंदाजी करण्यात अपयशी ठरत आहे. दुखापतीतून सावरलेला ऋषभ पंत संघर्ष करताना दिसत आहे. मार्कस स्टायनिस मधल्या फळीत चांगली कामगिरी करत आहे. वेगवान गोलंदाज एनरिच नॉर्खिया, कॅगिसो रबाडा भेदक मारा करत आहेत. त्यांना अनुभवी रवीचंद्रन अश्विनच्या फिरकीची साथ लाभत आहे.
केकेआर संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या निराशाजनक कामगिरीनंतर सामन्यात उतरणार आहे. त्या लढतीत केकेआर संघाला केवळ ८४ धावा करता आल्या होत्या. केकेआर सध्या १० गुणांसह चौथ्या स्थानी आहे. शुभमन गिल, नितीश राणा यांचे अपयश कोलकातासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. शिवाय अनुभवी दिनेश कार्तिकलाही छाप पाडता आलेली नाही. आंद्रे रसेल, सुनील नरेन मागील सामन्यात दुखापतीमुळे खेळू शकले नव्हते. आजच्या सामन्यात देखील आंद्रे रसेलच्या समावेशाबाबत साशंकता आहे. गोलंदाजीत पॅट कमिन्स, प्रसिद्ध कृष्णा, शुभव मावी यांना आपल्या कामगिरीत सुधारणा करावी लागेल.
दिल्ली-केकेआर हेड टु हेड -