महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

डॉ. विजय पाटील यांची एमसीएच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड? - mumbai cricket association election

४ आक्टोबरला एमसीएची निवडणूक होणार आहे. डॉ. विजय पाटील यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड होण्याचे निश्चित मानले जात आहे. एकूण 39 आंतरराष्ट्रीय खेळाडू आपले मत या नोंदवणार आहेत.

डॉ. विजय पाटील

By

Published : Sep 30, 2019, 11:42 PM IST

मुंबई -डॉ. डी. वाय. स्पोर्टस अकादमीचे विश्वस्त व अध्यक्ष डॉ. विजय पाटील यांची मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) अध्यक्षपदी बिनविरोध निवड होण्याचे निश्चित मानले जात आहे. ४ आक्टोबरला एमसीएची निवडणूक होणार आहे.

एमसीएममध्ये वर्चस्व असलेल्या बाळ म्हादळकर गटाचे माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांनी माघार घेतल्यानंतर अध्यक्षपदासाठी क्रिकेट फर्स्ट गटाचे प्रमुख आणि डी. वाय. पाटील क्रीडा अकादमीचे अध्यक्ष विजय पाटील यांना पाठिंबा दर्शविला आहे. त्यामुळे डॉ. विजय पाटील यांच्यासमोर कोणी प्रतिस्पर्धी नसल्याने त्यांची निवड होईलच असे सांगितले जात आहे.

आशिष शेलार आणि डॉ. पी. व्ही. शेट्टी यांचा सर्वसहमतीने डॉ. पाटील हे एमसीएच्या सर्वोच्च पदासाठी उमेदवार आहेत. पवार आणि म्हादळकर यांनी देखील आता आपला उमेदवार नसल्यामुळे डॉ. पाटील यांना पाठिंबा दिला आहे, त्यामुळे त्यांची निवड बिनविरोध होईल. मात्र, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार म्हादळकर गटाच्या वतीने उपाध्यक्षपदासाठी अमोला काळे लढणार आहेत. खजिनदारपदासाठी जगदीश आचरेकर लढतील.

बाळ म्हादळकर गटाने अध्यक्षपदाचा आपला उमेदवार संदीप पाटील यांना पाठिंबा दिला होता. मात्र, संदीप पाटील यांनी परस्पर हितसंबंधाच्या अडचणीमुळे या निवडणुकीतून माघार घेतल्याने आता डॉ. विजय पाटील यांना पाठिंबा देण्याशिवाय पर्याय नाही त्यामुळे ही विजय पाटील यांची निवड निश्चित समजली जात आहे.

या एमसीएच्या निवडणुकीत एकूण 39 आंतरराष्ट्रीय खेळाडू आपले मत नोंदवणार आहेत. यात सचिन व दिलीप वेंगसरकर हे देखील मतदानाचा हक्क बजावतील.

ABOUT THE AUTHOR

...view details