महाराष्ट्र

maharashtra

संदीप पाटील यांची माघार, एमसीएच्या अध्यक्षपदी 'या' व्यक्तीची लागणार वर्णी

By

Published : Oct 1, 2019, 11:19 AM IST

भारताचे माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांनी एमसीएच्या अध्यक्षपदासाठी अर्ज भरला होता. मात्र, पाटील यांनी निवडणूकीतून माघार घेतल्याने क्रिकेट फर्स्ट गटाचे विजय पाटील यांची अध्यक्षपदावरील निवड निश्चित मानली जात आहे. डी. वाय. पाटील क्रीडा अकादमीचे अध्यक्ष विजय पाटील यांना शरद पवार, उद्धव ठाकरे, आशिष शेलार यांची युती असलेल्या बाळा म्हादळकर गटाचा पाठिंबा आहे.

संदीप पाटील यांची माघार, एमसीएच्या अध्यक्षपदी 'या' व्यक्तीची लागणार वर्णी

मुंबई -नुकत्याच पार पडलेल्या बंगाल आणि हैदराबाद क्रिकेट संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणूकीनंतर सर्वांचे लक्ष मुंबईकडे लागले आहे. बीसीसीआयच्या श्रीमंत संघापैकी एक असलेल्या मुंबई क्रिकेट असोसिएशनची (एमसीए) निवडणूक येत्या चार ऑक्टोबरला पार पडणार आहे. मात्र, या निवडणूकीपूर्वीच एमसीएच्या अध्यक्षपदी कोण विराजमान होणार हे निश्चित झाले आहे.

हेही वाचा -तब्बल १९ महिन्यांच्या विश्रांतीनंतर भारतीय संघात परतला 'हा' वेगवान गोलंदाज!

भारताचे माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांनी एमसीएच्या अध्यक्षपदासाठी अर्ज भरला होता. मात्र, पाटील यांनी निवडणूकीतून माघार घेतल्याने क्रिकेट फर्स्ट गटाचे विजय पाटील यांची अध्यक्षपदावरील निवड निश्चित मानली जात आहे. डी. वाय. पाटील क्रीडा अकादमीचे अध्यक्ष विजय पाटील यांना शरद पवार, उद्धव ठाकरे, आशिष शेलार यांची युती असलेल्या बाळा म्हादळकर गटाचा पाठिंबा आहे.

विजय पाटील

निवडणूकीसाठी उभे राहिलेले संदीप पाटील एका वाहिनीसाठी समालोचन करतात. त्यामुळे लोढा समितीच्या शिफारशीमुळे त्यांना एकाच वेळी दोन पदावर राहता येणार नाही. या सर्व प्रकरणामुळे पाटील यांनी निवडणूकीतून माघार घेतली.

सर्वांना उत्सुकता लागून राहिलेल्या या निवडणूकीत ३९ आंतरराष्ट्रीय माजी क्रिकेटपटू मतदान करणार आहे. त्यामध्ये सचिन तेंडुलकर, दिलीप वेंगसरकर, अजित आगरकर, रमेश पोवार, संजय मांजरेकर, विनोद कांबळी, झहीर खान या महान व्यक्तींचा समावेश आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details