कोलंबो -कोरोनावर खबरदारीचा उपाय म्हणून श्रीलंकेने त्यांचे सर्व स्थानिक क्रिकेट सामने तहकूब केले आहेत. ईएसपीएनक्रिकइन्फो या वेबसाइटच्या अहवालानुसार, कोरोना व्हायरसवर काही प्रमाणात नियंत्रण ठेवण्यासाठी श्रीलंकेने शुक्रवारी, शनिवार आणि रविवारी कर्फ्यू लावला आहे.
हेही वाचा -'धोनीला टी-२० विश्वकरंडकासाठी टीम इंडियात घेऊ नये'
श्रीलंकेतील एका स्थानिक सामन्यात या आजाराचा प्रादुर्भाव झाल्याची चर्चा आहे. वास्तविक एस. थॉमस कॉलेज आणि रॉयल कॉलेज यांच्यात १२ ते १४ मार्च दरम्यान झालेल्या सामन्यात उपस्थित हजारो प्रेक्षकांपैकी एका प्रेक्षकाची कोरोना व्हायरसची चाचणी 'पॉझिटिव्ह' आली आहे.
श्रीलंकेचे अध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांनी मंगळवारी रॉयल थॉमसन सामना रद्द करण्याची मागणी केली होती. पण त्यांच्या या वक्तव्याकडे दुर्लक्ष केले गेले.