दुबई -आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेला आता २ आठवड्यांपेक्षा कमी काळ राहिला आहे. या वर्षाची विश्वकरंडक स्पर्धा इंग्लंड आणि वेल्समध्ये खेळण्यात येणार आहे. त्यापूर्वी आयसीसीकडून विश्वकरंडक विजेत्याला मिळणाऱ्या बक्षिसाची रक्कम जाहीर करण्यात आली.
२०१९ च्या विश्वकरंडक विजेत्या संघाला आयसीसी देणार इतकी मोठी रक्कम - ICC
यंदाच्या विश्वकरंडक विजेत्या संघाला मिळणार ४० लाख अमेरिकन डॉलर्स
यंदाच्या विश्वकरंडक विजेत्या संघाला ४० लाख अमेरिकन डॉलर्स (२८.०६ करोड रुपये) मिळणार आहेत. तर उप-विजेत्या संघाला २० लाख डॉलर्स म्हणजेच १४.०३ करोड रुपये बक्षिस म्हणून देण्यात येणार आहेत. उपांत्यफेरीमध्ये पराभूत झालेल्या प्रत्येक संघास ८ लाख अमेरिकन डॉलर्सचा (५.६१ करोड रुपये) इनाम घोषित करण्यात आला आहे.
३० मे ला इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्यातून क्रिकेटच्या महाकुंभाचे बिगुल वाजणार आहे. तर क्रिकेटची पंढरी असी ओळख असलेल्या लॉर्डसच्या मैदानावर विश्वकरंडकाचा अंतिम सामना होणार आहे.
या विश्वकरंडकात एकूण १० संघ सहभागी होणार आहेत. राउंड रॉबिन पद्धतीप्रमाणे प्रत्येक संघ एकमेकांसमोर येणार आहे. यानंतर गुणतालिकेतील अव्वल असलेले पहिले ४ संघ उपांत्यफेरीसाठी पात्र ठरतील.