नवी दिल्ली - पुढील दोन-तीन आयपीएलसाठी महेंद्रसिंह धोनी चेन्नई सुपर किंग्जकडून खेळेल, असा विश्वास भारतीय संघाचा माजी कर्णधार व्हीव्हीएस लक्ष्मणने व्यक्त केला आहे. एका वाहिनीवरील कार्यक्रमात लक्ष्मण म्हणाला, "मला वाटते की चेन्नईकडून खेळणे त्याच्यासाठी अधिक चांगले होईल कारण तो चांगल्या प्रकारे फिट आहे आणि वय फक्त एक आकडा आहे. एक कर्णधार म्हणून त्याला चेन्नईचा कर्णधारपदाचा आनंद आहे. "
''धोनी पुढच्या आयपीएल स्पर्धा खेळणार'' - dhoni and upcoming ipl news
एका वाहिनीवरील कार्यक्रमात लक्ष्मण म्हणाला, "मला वाटते की चेन्नईकडून खेळणे त्याच्यासाठी अधिक चांगले होईल कारण तो चांगल्या प्रकारे फिट आहे आणि वय फक्त एक आकडा आहे. एक कर्णधार म्हणून त्याला चेन्नईचा कर्णधारपदाचा आनंद आहे. "
तो म्हणाला, "असे करण्यात तो खूप यशस्वी झाला आहे. धोनीच्या खेळाचा विचार कराल तर मला खात्री आहे की आपण त्याला खेळताना पाहावे अशी इच्छा आहे. फक्त यंदाचे आयपीएलच नाही. कदाचित पुढील काही आयपीएल तो खेळेल आणि त्यानंतर निर्णय घेईल."
धोनी आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करुन भारतीय संघात पुन्हा स्थान मिळवू इच्छित आहे. पण आयपीएलवर सद्या कोरोनाचे सावट आहे. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी आयपीएल विसरा, असे सूचक संकेत दिले आहे. जर आयपीएल स्पर्धा रद्द झाल्यास धोनीचे भवितव्य अंधारात आहे. आजही धोनीच्या निवृत्तीविषयी सोशल मीडियावर चर्चा सुरू आहेत. पण धोनीने अद्यापही याविषयी कोणतेही संकेत दिलेले नाही.