रांची - नुकत्याच पार पडलेल्या बांगला देशविरूद्धच्या टी-२० क्रिकेट मालिकेत भारताने विजय मिळवला. भारताने ही मालिका २-१ ने खिशात घातली असली तरी, धोनीची उणीव ही त्याच्या चाहत्यांना नेहमी जाणवत असते. त्यामुळे तो संघाबाहेर असला तरी, त्याच्या हालचालीची नेहमीच चर्चा होत असते.
क्रिकेट सोडून धोनी टेनिसच्या मैदानावर गाळतोय घाम..पाहा व्हिडिओ - धोनी टेनिस न्यूज
धोनी सध्या क्रिकेट नव्हे तर, टेनिसच्या मैदानावर घाम गाळताना दिसून आला. रांचीतील झारखंड राज्य क्रिकेट असोसिएशन कॉम्प्लेक्स येथे टेनिस स्पर्धेत धोनीने भाग घेतला होता. टेनिस खेळतानाचा धोनीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी जवळपास चार महिन्यांपासून क्रिकेटपासून लांब आहे. त्याने अखेरचा सामना इंग्लंडमध्ये पार पडलेल्या विश्वकरंडक स्पर्धेत खेळला होता. क्रिकेटच्या मैदानात धुमाकूळ घालणारा धोनी आता टेनिसमुळे चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वी, तो अभिनेता अर्जुन कपूरसोबत फुटबॉलचा सराव करताना दिसला होता. ३८ वर्षीय धोनीचे फुटबॉल प्रेम जगजाहीर असून त्याने स्वतः इंडियन सुपर लीगमध्ये आपला एक संघ विकत घेतला आहे.