जयपूर -सवाई मानसिंह स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या आयपीएलच्या ४० व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्सवर ६ गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात राजस्थानच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारीत २० षटकांमध्ये ६ गडी गमावत १९१ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीच्या संघाने रिषभ पंतच्या ३६ चेंडूत ७८ धावांच्या वादळी खेळीच्या जोरावर १९.२ षटकांमध्ये ४ गडी गमावत मोठा विजय मिळवला. या विजयासह दिल्लीच्या संघाने आयपीएलच्या गुणतालिकेत १४ गुणांसह अव्वल स्थान पटकावले आहे.
रिषभ पंतच्या वादळी खेळीच्या जोरावर दिल्लीचा राजस्थानवर विजय - IPL
दिल्लीचा संघ आयपीएलच्या गुणतालिकेत १४ गुणांसह अव्वल
राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना अजिंक्य रहाणेच्या दमदार १०५ धावांच्या शतकी तर कर्णधार स्टीव्ह स्मिथच्या ५० धावांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर १९१ धावा केल्या. दिल्लीकडून कॅगिसो रबाडाने सर्वाधिक २ विकेट घेतलेत. स्मिथ आणि रहाणे वगळता इतर कोणताही खेळाडूला जास्त वेळ खेळपट्टीवर टिकू शकला नाही.
धावांचा पाठलाग करताना दिल्लीच्या संघाने धमाकेदार सुरुवात केली. सलामीवीर शिखर धवन २७ चेंडूत ५४ तर पृथ्वी शॉने ३९ चेंडूत ४२ धावा करत विजयाचा पाया रचला. त्यानंतर चौथ्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतने ७८ धावांची धमाकेदर फंलदाजी करत दिल्लीच्या विजयाचा कळस बांधला. राजस्थानकडून श्रेयस गोपालने २ तर धवल कुलकर्णी आणि रियान पराग यांनी प्रत्येकी १ बळी घेतला. पंतच्या शानदार फलंदाजीसाठी त्याला सामनाविराचा पुरस्कार देण्यात आला.