शारजाह - आयपीएल २०२० मध्ये आज १६ वा सामना कोलकाता नाइट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होणार आहे. हा सामना फलंदाजीसाठी नंदनवन असलेल्या शारजाहच्या मैदानावर होणार आहे. कोलकाता या सामन्यात आपल्या सलामीवीर जोडीमध्ये बदल करण्याची दाट शक्यता आहे.
शुबमन गिल आणि सुनिल नरेन या दोघांनी मागील तीन सामन्यात कोलकाताच्या डावाची सुरूवात केली. पण, तीनही सामन्यात सुनिल नरेन धावा करण्यात अपयशी ठरला. यामुळे आजच्या दिल्ली विरूद्धच्या सामन्यात नरेनच्या जागेवर स्फोटक फलंदाज टॉम बँटनचा समावेश केकेआर करू शकते.
केकेआरच्या मधल्या फळीची भिस्त नितीश राणा, कर्णधार दिनेश कार्तिक, इयॉन मॉर्गन आणि स्फोटक आंद्रे रसेल यांच्यावर असेल. गोलंदाजीत केकेआर शिवम मावी, कमलेश नागरकोटी आणि पॅट कमिन्स चांगली कामगिरी करत आहेत. कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती फिरकी मारा व्यवस्थित सांभाळत आहे. यामुळे नरेनच्या जागेवर बँटनला स्थान मिळू शकते.