मुंबई- सनरायजर्स हैदराबादचा फलंदाज डेव्हिड वॉर्नरवर आयपीएलच्या मागच्या मोसमात बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे तो २०१८ च्या आयपीएलला मुकला होता. मात्र या वर्षात वॉर्नरने आयपीएलमध्ये धमाकेदार कामगिरी करत ऑरेंज कॅपच्या शर्यतीत पहिल्या स्थानावर आहे. आयपीएलच्या एका मोसमात सर्वाधिक धावा काढणारा फलंदाज ऑरेंज कॅपचा मानकरी ठरतो.
वॉर्नरने आयपीएलच्या या मोसमात १२ सामने खेळताना १ शतक व ८ अर्धशतकांसह ६९.२० सरासरीने ६९२ धावा केल्या आहेत. ६०० पेक्षा जास्त धावा करणारा वॉर्नर हा या मोसमातील एकमेव खेळाडू आहे. ऑरेंज कॅपच्या शर्यतीत वॉर्नरच्या आसपास कोणताच खेळाडू नसल्याने आयपीएलच्या या मोसमाची ऑरेंज कॅप ही वॉर्नरकडेच राहणार आहे.