मेलबर्न -ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नरने कोरोना व्हायरस विरुद्ध लढणार्या डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या समर्थनार्थ आपले मुंडण केले आहे. वॉरर्नरने मुंडण करतानाचा व्हिडिओ आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला.
कोरोनाविरोधात संपूर्ण जग युद्ध लढत आहे. डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी सातत्याने कार्यरत आहेत. अशा परिस्थितीत या लोकांच्या समर्थनार्थ मी माझे मुंडण करण्याचे ठरवले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करताना मी मुंडण केले होते, असे त्याने व्हिडिओमध्ये सांगितले.