महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

वॉर्नर मायदेशी परतला, जाता जाता हैदराबादने दिलेल्या पाठिंब्यासाठी व्यक्त केली कृतज्ञता

वॉर्नरने आयपीएलच्या या मोसमात 12 सामने खेळताना 69.20 सरासरीने 692 धावा केल्या आहेत

डेव्हिड वॉर्नर

By

Published : Apr 30, 2019, 7:39 PM IST

हैदराबाद -सनरायझर्स हैदराबादने सोमवारी रात्री राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर किंग्ज इलेव्हन पंजाबचा 45 धावांनी पराभत करत आयपीएल 2019 च्या प्लेऑफमध्ये आपले आव्हान जिवंत ठेवले आहे. हैदराबादसाठी खेळताना ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरने अनेक वेळा शानदार खेळी साकारल्यात. त्याने हैदाराबदसाठी या मोसमात आठ वेळा अर्धशतकी आणि एक वेळा शतकी खेळी करत अनेकवेळा त्याने हैदराबादच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला आहे.

वॉर्नर


पंजाबविरुद्ध काल खेळलेल्या सामन्यातही वॉर्नरने ५६ चेंडूत दमदार ८१ धावा केल्या. त्याच्या या खेळीच्या जोरावर हैदराबादने पंजाबसमोर 212 धावांचे आव्हान उभे करु शकले. या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबचा संघ 167 धावा करु शकला. हैदराबादने मोक्याच्या क्षणी मिळवलेल्या या विजयामुळे प्ले ऑफमध्ये पोहचण्याच्या आशा बळावल्या आहेत. वॉर्नरने आयपीएलच्या या मोसमात 12 सामने खेळताना 69.20 सरासरीने 692 धावा केल्या आहेत. तसेच तो आतापर्यंत या मोसमात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला आहे.


पंजाबविरुद्ध खेळण्यात आलेला सामना हा वॉर्नरचा आयपीएलच्या या मोसमातील अखेरचा सामना ठरला. आस्ट्रेलियाच्या विश्वचषकासाठीच्या संघात वॉर्नरचाची निवड झाल्याने त्याला हैदराबादची साथ अर्ध्यावर सोडून मायदेशी परतावे लागले आहे. अखेरच्या सामन्यात विजय मिळवल्याचे समाधान आणि आनंद व्यक्त करत त्याने हैदराबाद संघाचा भावनिक निरोप घेतला. वॉर्नरने इंस्टाग्रामवर एक पोस्ट करत, हैदराबादच्या संघाने यावर्षी आणि मागच्या वर्षीच्या कठीण काळात दिलेल्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केलीय. तसेच त्याने आयपीएलमधील उरलेल्या सामन्यांसाठी हैदराबादच्या संघाला शुभेच्छा दिल्या आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details