महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

डेव्हिड वॉर्नरने सनरायझर्सच्या फॅन्ससाठी पाठविला खास मेसेज

डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्त्वाखाली हैदराबादने २०१६ साली आयपीएलचा किताब जिंकला होता. त्यावर्षी त्याने १७ सामन्यात ८४८ धावा केल्या होत्या. हैदराबादचा यंदाचा पहिला सामना २९ मार्च रोजी राजस्थान रॉयल्सविरुद्ध हैदराबाद येथे होणार आहे.

वॉर्नर

By

Published : Mar 12, 2019, 10:24 PM IST

सिडनी - आयपीएल-२०१९ च्या मौसमात ऑस्ट्रेलिया संघाचा स्फोटक फलंदाज डेव्हिड वॉर्नर सनरायझर्स हैदराबाद संघाची धुरा सांभाळणार आहे. गेल्यावर्षी त्याच्यावर चेंडूशी छेडछाड केल्याप्रकरणी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने एक वर्षाची बंदी घातली होती. त्यामुळे गतवर्षी तो आयपीएलमध्ये खेळू शकला नाही. हैदराबादच्या संघाकडून खेळणाऱ्या डेव्हिड वॉर्नरने फॅन्ससाठी एक खास संदेश पाठविला आहे.

डेव्हिड वॉर्नरने संदेशात म्हटले आहे की, एवढी वर्षे आम्हांला फॅन्सनी जे प्रेम दिले त्याबद्दल धन्यवाद. आता वेळ आली आहे की, क्रिकेट फॅन्सना काही तरी खास देण्याची. वॉर्नरने हैदराबादमध्ये होणाऱ्या आयपीएलच्या सामन्यांसाठी तिकिटांची किंमत ५०० रुपये ठेवण्यात आली असल्याचेही सांगितले.

डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्त्वाखाली हैदराबादने २०१६ साली आयपीएलचा किताब जिंकला होता. त्यावर्षी त्याने १७ सामन्यात ८४८ धावा केल्या होत्या. हैदराबादचा यंदाचा पहिला सामना २९ मार्च रोजी राजस्थान रॉयल्सविरुद्ध हैदराबाद येथे होणार आहे.

गेल्या वर्षी डेव्हिड वॉर्नरच्या गैरहजेरीत संघाचे नेतृत्व न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसन याने केले होते. केनने संघाला योग्य मार्गदर्शन करत अंतिम सामन्यापर्यंत पोहोचवले होते. अंतिम सामन्यात चेन्नईने त्यांचा पराभव केला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details