महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

IPL : सराव सामन्यात वॉर्नरने ठोकले दमदार अर्धशतक - Fifty

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने गेल्यावर्षी चेंडूशी छेडछाड प्रकरणात वॉर्नरवर एका वर्षाची बंदी घातल्याने तो गेल्या मोसमात आयपीएलमध्ये खेळू शकला नव्हता

David Warner

By

Published : Mar 19, 2019, 1:45 PM IST

हैदराबाद - आयपीएल सुरू होण्यापूर्वी सर्वच संघ कसुन सराव करत आहेत. सनरायझर्स हैदराबादही आपल्या घरच्या राजीव गांधी आतंरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर मेहनत घेत आहे. सरावासाठी हैदराबादने २ संघ बनवले होते.



सराव सामन्यात अ संघाकडून खेळताना हैदराबादचा माजी कर्णधार डेव्हिड वॉर्नरने शानदार ४३ चेंडूत ६५ धावांची खेळी केली. वॉर्नर व्यतिरीक्त मनिष पांडेने ६७ तर, दीपक हुडाने केलेल्या ५५ धावांच्या जोरावर अ संघाने २१२ धावा केल्या. २१३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना रिकी भूई आणि युसुफ पठाणच्या दमादार खेळीमुळे ब संघाने १९ व्या षटकात विजय मिळवला.

डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्त्वाखाली हैदराबादने २०१६ साली आयपीएलचा किताब जिंकला होता. त्यावर्षी त्याने १७ सामन्यात ८४८ धावा केल्या होत्या. हैदराबादचा यंदाचा पहिला सामना 24 मार्च रोजी केकेआरविरुद्ध होणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details