महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jan 6, 2020, 4:57 PM IST

ETV Bharat / sports

VIDEO : वॉर्नरची हुज्जत, पंच अलिम दार यांनी दिली 'ही' शिक्षा

घडले असे की, ऑस्ट्रेलियाचा संघ दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी उतरला होता. डेव्हिड वॉर्नर आणि मार्नस लाबुशेन फलंदाजी करत होते. ऑस्ट्रेलियाच्या १ बाद २०७ धावा झाल्या होत्या. त्यावेळी वॉर्नर आणि लाबूशेन दोघे धाव घेताना खेळपट्टीच्या मधून धावले. पंचांनी वारंवार बजावूनही ती चूक त्यांनी पुन्हा केली. तेव्हा पंच अलिम दार यांनी संघाच्या धावसंख्येतून पाच धावा वजा करण्याचा निर्णय घेतला.

David Warner argues with Aleem Dar after umpire hands Australia 5-run penalty
VIDEO : वॉर्नरची हुज्जत, पंच अलिम दार यांनी दिली 'ही' शिक्षा

सिडनी - ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडविरुद्धचा तिसरा आणि अखेरचा कसोटी सामना २७९ धावांनी जिंकला आणि मालिकेत ३-० ने निर्भेळ यश मिळवले. फिरकीपटू नॅथन लियोनचे ५ बळी आणि त्याला मिचेल स्टार्कच्या प्रभावी माऱ्याची मिळालेली साथ यामुळे, यजमान ऑस्ट्रेलिया विजय साकारला. ऑस्ट्रेलियाने सामन्यात विजय मिळवला असला तरी डेव्हिड वॉर्नरने पंचांशी घातलेली हुज्जत चर्चेचा विषय ठरला.

घडले असे की, ऑस्ट्रेलियाचा संघ दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी उतरला होता. डेव्हिड वॉर्नर आणि मार्नस लाबुशेन फलंदाजी करत होते. ऑस्ट्रेलियाच्या १ बाद २०७ धावा झाल्या होत्या. त्यावेळी वॉर्नर आणि लाबूशेन दोघे धाव घेताना खेळपट्टीच्या मधून धावले. पंचांनी वारंवार बजावूनही ती चूक त्यांनी पुन्हा केली. तेव्हा पंच अलिम दार यांनी संघाच्या धावसंख्येतून पाच धावा वजा करण्याचा निर्णय घेतला.

पंच अलिम दार यांचा निर्णय वॉर्नरला पटला नाही. त्यामुळे त्याने पंचांशी हुज्जत घातली. पण धावा वजा केल्यानंतर मात्र खेळ पुन्हा सुरू झाला. वॉर्नरने दुसऱ्या डावात १११ धावांची खेळी केली. तर लाबुशेनने ६९ धावा करत त्याला चांगली साथ दिली.

ऑस्ट्रेलियाच्या माऱ्यासमोर न्यूझीलंडचा दुसरा डाव अवघ्या १३६ धावांत आटोपला. तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाने आपला दुसरा डाव २१७ धावांवर घोषित केला आणि पहिल्या डावातील आघाडी मिळून न्यूझीलंडला ४१६ धावांचे लक्ष्य मिळाले.

ऑस्ट्रेलियाने दिलेल्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करण्यात, न्यूझीलंड संघ सपशेल अपयशी ठरला. नॅथन लिओनने ५० धावांत ५ गडी बाद करत न्यूझीलंडची फलंदाजी कापून काढली. तर त्याला मिचेल स्टार्कने ३ गडी बाद करत चांगली साथ दिली. दमदार कामगिरी करणाऱ्या मार्नस लाबुशेनला सामनावीर आणि मालिकावीर असा दुहेरी सन्मान मिळाला.

हेही वाचा -ऑस्ट्रेलियाचा न्यूझीलंडला ‘व्हाईटवॉश’

हेही वाचा -#HBDKapilDev : क्रिकेटच्या कारकिर्दीत कधीही 'रनआऊट' न झालेला क्रिकेटपटू

ABOUT THE AUTHOR

...view details