महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

भारताविरूद्धच्या सामन्यात किलर मिलरने केली पाक खेळाडूच्या विक्रमाची बरोबरी

अखेरच्या टी-२० सामन्यात मिलरने आंतरराष्ट्रीय टी-२० मधील क्षेत्ररक्षक म्हणून ५० वा झेल घेतला. त्याने आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये क्षेत्ररक्षक म्हणून सर्वाधिक झेल घेण्याच्या शोएब मलिकच्या विश्वविक्रमाची बरोबरी केली आहे. मलिकने१११ सामन्यात ५० झेल घेतले आहेत. तर, मिलरने हा पराक्रम फक्त ७१ सामन्यांतच केला आहे.

भारताविरूद्धच्या सामन्यात किलर मिलरने केली पाक खेळाडूच्या विक्रमाची बरोबरी

By

Published : Sep 23, 2019, 8:15 AM IST

बंगळुरु -कर्णधार क्विंटन डी कॉकच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने अखेरच्या टी-२० सामन्यात भारतावर ९ गडी राखून विजय मिळवला. या विजयासह मालिका १-१ ने बरोबरीत सुटली आहे. आफ्रिकेचा धडाकेबाज खेळाडू डेव्हिड मिलरने या सामन्यात एका विक्रमाची बरोबरी केली.

हेही वाचा -IND VS SA : रोहित शर्माला मागे टाकत विराट कोहलीने पटकावले अव्वलस्थान

अखेरच्या टी-२० सामन्यात मिलरने आंतरराष्ट्रीय टी-२० मधील क्षेत्ररक्षक म्हणून ५० वा झेल घेतला. त्याने आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये क्षेत्ररक्षक म्हणून सर्वाधिक झेल घेण्याच्या शोएब मलिकच्या विश्वविक्रमाची बरोबरी केली आहे. मलिकने१११ सामन्यात ५० झेल घेतले आहेत. तर, मिलरने हा पराक्रम फक्त ७१ सामन्यांतच केला आहे.

या सामन्यात, भारताने दिलेले १३५ धावांचे आव्हान आफ्रिकेने १७ षटकात सहज पूर्ण केले. डी-कॉकने नाबाद ७९ धावा करत संघाला विजय मिळवून दिला. आफ्रिकेचे सलामीवीर डी-कॉक आणि हेंड्रिग्ज यांनी आफ्रिकेला आश्वासक सुरुवात करून दिली. दोघांनीही पहिल्या गडीसाठी ७६ धावांची भागीदारी केली. भारतीय गोलंदाजांचा समाचार दोघांनी घेतला. हेंड्रिग्ज हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर २८ धावांवर बाद झाला. यानंतर डी कॉक आणि टेंम्बा बावुमा यांनी संघाला एकतर्फी विजय मिळवला.

टी20मध्ये सर्वाधिक झेल घेणारे क्षेत्ररक्षक -

  • ५० - डेव्हिड मिलर (७१ सामने)
  • ५० - शोएब मलिक (१११ सामने)
  • ४४ - एबी डिविलियर्स (५२ सामने)
  • ४४ - रॉस टेलर (९० सामने)
  • ४२ - सुरेश रैना (७८ सामने)

ABOUT THE AUTHOR

...view details