कराची -विंडीजचा धडाकेबाज अष्टपैलू क्रिकेटपटू डॅरेन सॅमीला पाकिस्तानचे मानद नागरिकत्व मिळणार आहे. पण तत्पूर्वी, त्याला आणखी एक मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सॅमीला एका पाकिस्तानी संघाचे प्रशिक्षकपद देण्यात आले असून तो दोन वर्ष या भूमिकेत असणार आहे.
हेही वाचा -भारताच्या कर्णधाराचा 'हा' व्हिडिओ सोशल मीडियावर ठरतोय तुफान हिट!
पाकिस्तान सुपर लीगमधील संघ असलेला पेशावर झाल्मी हा सॅमीच्या नेतृत्वाखाली खेळला होता. मात्र, सॅमीकडून कर्णधारपदाची जबाबदारी काढून घेण्याचा निर्णय झाला आहे. त्याच्याकडे संघाच्या प्रशिक्षकाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. वहाब रियाझ हा झाल्मी संघाचा नवा कर्णधार असणार आहे.
कर्णधारपद काढून घेण्यात आले असले तरी, तो खेळाडू-कम-प्रशिक्षक अशा दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. २०१७ मध्ये सॅमीने पेशावर झाल्मी संघाला पाएसएलचे जेतेपद पटकावून दिले होते. या पाकिस्तानमध्ये दाखल होणारा सॅमी हा पहिला परदेशी खेळाडू आहे. सॅमीच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडिजनं २०१२ आणि २०१६ मध्ये टी-२० वर्ल्ड कप जिंकला होता.