महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

चेंडू छेडछाड प्रकरणानंतर डॅरेन लेहमन यांचे क्रिकेटमध्ये पुनरागमन - प्रशिक्षक

बिग बॅश लीगमधील संघ ब्रिस्बेन हीटने लेहमन यांना प्रशिक्षकपदी नियुक्त केले आहे. ब्रिस्बेन हीटने २०१३ साली डॅरेन लेहमन यांच्या प्रशिक्षकपदाच्या कार्यकाळातच बिग बॅश लीगचे विजेतेपद पटकावले होते.

डॅरेन लेहमन

By

Published : Mar 7, 2019, 7:56 PM IST

Updated : Mar 7, 2019, 8:04 PM IST

ब्रिस्बेन- गेल्यावर्षी दक्षिण आफ्रिकेत झालेल्या चेंडू छेडछाड प्रकरणानंतर ऑस्ट्रेलिया संघाचे प्रशिक्षकपद गमावणाऱ्या डॅरेन लेहमन यांनी क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आहे. बिग बॅश लीगमधील संघ ब्रिस्बेन हीटने लेहमन यांना प्रशिक्षकपदी नियुक्त केले आहे. ब्रिस्बेन हीटने २०१३ साली डॅरेन लेहमन यांच्या प्रशिक्षकपदाच्या कार्यकाळातच बिग बॅश लीगचे विजेतेपद पटकावले होते.

लेहमन म्हणाले, वाईट काळात तुम्ही खूप काही शिकता. मी क्रिकेटवर खूप प्रेम करतो. त्यामुळे मी संघातील युवा प्रतिभावान खेळाडूंसोबत काम करण्यासाठी उत्सुक आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध गेल्यावर्षी ऑस्ट्रेलियाच्या कॅमेरुन बेनक्राफ्ट याने एका पट्टीने चेंडू घासला होता. त्याची ही कृती कॅमेऱ्यात कैद झाली होती. यानंतर कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि उपकर्णधार डेव्हिड वार्नर यांच्यावर प्रत्येकी एक-एक वर्षाची बंदी घालण्यात आली होती. तर, कॅमेरुन बेनक्राफ्टवर ९ महिन्यांची बंदी घालण्यात आली होती. या घटनेनंतर प्रशिक्षक डॅरेन लेहमन यांनी राजीनामा दिला होता.

Last Updated : Mar 7, 2019, 8:04 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details